जाऊया डबल सीट रं…नेहाच्या अदांवर नेटिझन्स झाले फिदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेश कोठारे दिग्दर्शित ‘दे दना दन’ हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला होता. 34 वर्षांनंतरही यातील ‘पोलीसवाल्या सायकलवाल्या बिरेक लावून थांब…’ या गाण्याची जादू कायम आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रेमाकिरण यांच्याकर चित्रित केलेले हे गाणे आजही विविध कार्यक्रमात वाजवले जाते. त्यावर परफॉर्मन्स सादर केले जातात.

नव्या दमाच्या कलाकारांनाही या गाण्यावर परफॉर्मन्स करण्याचा मोह आवरता येत नाही. नुकतेच ‘देवमाणूस’ या मालिकेतील एसीपी दिव्या सिंह म्हणजेच अभिनेत्री नेहा खान हिने या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स केला आहे. या क्हिडिओत नेहासोबत देवीसिंग प्रकरणाचा तपास करणारे हवालदार शिखरे म्हणजेच अभिनेते सत्यवान शिखरेदेखील झळकत आहेत. नेहाने इन्स्टाग्राम रीलवर हा क्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या एका दिवसात या क्हिडिओला दीड लाखांच्या घरात क्हय़ूज आणि 27 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.