विक्रांत बचाव घोटाळा, नील किरीट सोमय्यांची साडेतीन तास कसून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली लोकांकडून कोटय़वधींचा निधी गोळा करून त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी नील किरीट सोमय्या यांची आज आर्थिक गुन्हे शाखेत साडेतीन तास कसून चौकशी केली. आणखी तीन दिवस नील सोमय्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गेल्या आठवडय़ात किरीट सोमय्या यांची चार दिवस कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज कोर्टाच्या निर्देशानुसार नील सोमय्या यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या जनरल चिटिंग युनिट-4 च्या पथकाने साडेतीन तास तपास केला. गुह्याच्या अनुषंगाने प्रश्नांची सरबती करून पोलिसांनी नील सोमय्यांचा जबाब नोंदवून घेतला.