नेपाळमध्ये 100 मीटर खोल दरीत बस कोसळली;14 जण ठार; 18 जखमी

531
accident

नेपाळच्या सिंधुपालचोक जिल्ह्यात रविवारी झालेल्या एका बस दुर्घटनेत किमान 14 जण ठार झाले असून अन्य 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्रवाशांनी भरलेली ही बस दोखला जिल्ह्यातील कालिनचोक येथून भक्तपूर येथे जात होती. अरनिको महामार्गावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती 100 मीटर खोल दरीत कोसळली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेतील मृतांमध्ये 11 वयस्कांसह तीन मुलांचा समावेश आहे. यातील 12 जण घटनास्थळीच मरण पावले. या दुर्घटनेतील जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस अधीक्षक नवाराज न्यूपाने यांनी सांगितले. मृतांची ओळख अजून पटलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुर्घटना घडल्यानंतर बसचालक पळून गेला आहे. त्याचाही पोलीस कसून शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या