अंघोळ करताना ‘या’ 5 चुका कधीही करू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेहऱ्यावरील मुरुमांकडे काही जण दुर्लक्ष करतात. मुरुम येण्याचे प्रमाण वाढले तर ते त्रासदायक ठरू शकते. यामुळे त्वचेला खाज येणे, स्किन इरिटेशन अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. शरीर आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी दररोज अंघोळ करणे महत्त्वाचे आहे. यामुळे शारीरिक चपळतेबरोबरच स्वच्छतादेखील राखली जाते. शिवाय अनेक आजारही टळतात. काही जण अंघोळ करताना चुका करतात. या चुका टाळणे आवश्यक आहे.

चेहऱ्यावर येणारी मुरुमं काही वेळा शरीरातील इतर अनेक भागांवरही येतात. बहुतेक वेळा खांद्यावर, पाठीवरही मुरुमे येऊ शकतात. सुरुवातीला ते दिसत नसले ती काही दिवसांनी त्या जागी खाज सुटते. शारीरिक सौंदर्याला बाधा ठरणाऱ्या आणि शरीरावर येणारे मुरुमं, पुरळ याकरिता योग्य पद्धतीने अंघोळ करणे आवश्यक आहे. त्याकरिता वापरला जाणारा साबण हलका असावा. त्यामध्ये तेल आणि क्लिन्झरचे गुणधर्म असावेत. चुकीचा साबण वापरला तर त्वचेच्या तक्रारी उद्भवू शकतात.

अंघोळ करताना लिंबू, व्हिनेगर अशा काही घरगुती वस्तू डायरेक्ट त्वचेवर लावू नका. यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे, याची माहिती करून घेऊन त्याप्रमाणे ब्यूटि प्रोडक्ट वापरा.

हिवाळ्यात बहुतांश लोकांना गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. अति कडक गरम पाण्याने अंघोळ केल्यानेसुद्धा त्वचा कोरडी पडू शकते. ज्यांना त्वचेवर मुरुमं, पुरळ येणं ही समस्या असेल त्यांनी अति गरम पाण्याने अंघोळ करू नये.

व्यायाम केल्यानंतर लगेचच अंघोळ करण्याची चूक करू नका. असे केल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. व्यायामामुळे अंगाला आलेला घाम पूर्णत: वाळल्यानंतरच अंघोळ करा. यांचा त्वचेवर वापर करून लगेचच अंघोळीला जाऊ नका. जर तुम्हाला व्यायामानंतर लगेचच अंघोळ करायची असेल तर व्यायाम केल्यामुळे आलेला घाम टॉवेलने पुसून काढा.

अंघोळीचे टॉवेल्स नियमितपणे स्वच्छ धुवा. ते दररोज उन्हात वाळवा. ओले टॉवेल्स वापरू नका. यामुळे अॅलर्जी होऊ शकते. अंग पुसण्यासाठी कोरड्या टॉवेलचा वापर करा.

अंघोळीच्या वेळी शरीर स्क्रबिंगसाठी लोफाचा वापर करत असाल तर लोफा नियमित स्वच्छ करा. दर तीन आठवड्यांनी लोफा बदला.