
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे आणखी 71 रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3787 झाली आहे. तर शनिवारी 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनावर मात करुन बरे झालेल्या 74 जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे शनिवारी तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील 65 वर्षीय एक रुग्ण, खेड तालुक्यातील वेरळ येथील 75 वर्षीय आणि चिपळूण येथील 52 वर्षीय रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण रत्नागिरी तालुक्यात असून रत्नागिरीत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. चिपळूणमध्ये 29, दापोलीत 21, खेडमध्ये 15, संगमेश्वरमध्ये 10, राजापूरमध्ये 7, गुहागरमध्ये 4, लांजामध्ये 2 आणि मंडणगड तालुक्यात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1183 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 2472 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.



























































