रेल्वेच्या एक्प्रेस गाडय़ांमध्ये आणखी एक एसी कोच; आता एसी इकॉनॉमी क्लासही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्याधुनिक सोयीसुविधा आणि पूर्वीपेक्षा जास्त आसन क्षमता असलेला थ्री टियर एसी इकॉनॉमी क्लास हा नवीन कोच रेल्वेच्या एक्स्प्रेस गाडय़ांना जोडण्यात येणार आहे. या नव्या कोचमुळे एक्स्प्रेस गाडय़ांतील एसी कोचची संख्या चार होणार असून या इकॉनॉमी क्लासचे प्रवास भाडे थ्री टियर कोचपेक्षाही कमी असणार आहे.

नव्या एसी कोचमध्ये आसन क्षमता 83 असून सध्या सुरू असलेल्या थ्री टियर एसीची प्रवास क्षमता 72 आसने एवढी आहे. तसेच या कोचचे प्रवास भाडे हे एसी थ्री टियर आणि नॉन एसी स्लीपर क्लासदरम्यान असणार आहे. म्हणजेच प्रवाशांना 3 एसी कोचपेक्षा कमी दरात तिकीट उपलब्ध होणार आहे. एक्स्प्रेस गाडय़ांचा हा नवा कोच पंजाबमधील कपूरथला रेल्वे कारखान्यात तयार होत असून अशा प्रकारचे 248 कोच तयार होत आहेत. सद्यस्थितीत मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी, एसी 3 हे तीन एसी कोच आहेत. यापुढे थ्री टियर एसी इकॉनॉमी कोचही जोडला जाणार आहे.

प्रत्येक बर्थला एसी वेंट, प्रवाशांना गारेगार प्रवासाचा आनंद मिळणार

  • मिडल आणि अप्पर बर्थवर जाण्यासाठी सोप्या शिडय़ांची व्यवस्था
  • रात्रीच्या प्रवासा वेळी एलईडी लायटिंग
  • दिव्यांग फ्रेंडली टॉयलेटची रचना
  • पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्लेची सोय, येणारे स्टेशन, रेल्वेची गती याची माहिती मिळणार
  • आधुनिक फायर सेफ्टी सिस्टीमची सोयही.