नवीन महाविद्यालय व अभ्यासक्रमाचे वेळापत्रक पुढे ढकलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरू करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडय़ा किंवा सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे. कोविडमुळे 2021-22 या वर्षात ही कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.