नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासांत देशात 19,740 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 36 हजार 643 वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या कोरोना बाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे.देशातली उपचाराधीन रुग्णांची संख्या 2 लाख 36 हजार 643 वर पोहोचली असून ती एकूण कोरोनाबाधितांच्या प्रमाणापेक्षा एक टक्क्यांहूनही कमी आहे. हा आकडा 206 दिवसांतला सर्वात कमी आहे. तर, एकूण 3,32,48,291 रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण 97.98 टक्के इतके आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या 94 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत लस टोचून घेतलेल्या नागरिकांची संख्या 79 लाख 12 हजार 202 वर पोहोचली आहे.