पाथर्डी तालुक्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण; कोरोनाबाधितांची संख्या 44 वर

657

पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील 45 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44 झाली आहे. गेल्या 5-6 दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

नगर जिल्ह्यामध्ये सात तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामध्ये पाथर्डीचा समावेश होता. आता पाथर्डीत कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. तो मुंबईत भाजी विक्रीसाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्याच्यावर येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 44 रुग्ण झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या