
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान कंपन्यांना 85 टक्के प्रवासी क्षमतेने सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आढाव्यानंतर प्रवासीक्षमता 72.5 टक्क्यांवरून 85टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाड्याची कमाल व किमान मर्यादाही केवळ 15 दिवसांपुरतीच लागू असेल. कंपन्यांना इतर 15 दिवसांसाठी या मर्यादेपासून मुभा असेल. मात्र कंपन्यांनी या महिन्यापर्यंत भाडेवाढ करण्याची गरज नाही. याआधी मंत्रालयाने देशातील विमान कंपन्यांना उड्डाणक्षमता 65टक्क्यांवरून 72.5टक्के करण्याची परवानगी दिली होती, असे मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

























































