अंतराळात सापडली नवी पृथ्वी! पाण्याचे ढग असण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वीपासून 90 प्रकाशवर्ष दूर अंतरावर एका बाह्यग्रहाचा शोध लागला आहे. या अद्भुत ग्रहावर पृथ्वीसारखे पाण्याचे ढग असण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे. ‘पृथ्वी 2.0’ च्या शोधाबद्दल शास्त्रज्ञांमध्ये खूप उत्सुकता आहे.

‘टीओआय- 1231 बी’ असे या बाह्यग्रहाचे नाव असून तो 24 दिवसांत आपल्या ताऱयाची परिक्रमा पूर्ण करतो. हा ग्रह आपल्या सूर्याची परिक्रमा करत नाही. तर ‘एनएलटीटी 24399’ या दुसऱया ताऱयाची परिक्रमा करतो. हा तारा सूर्यापेक्षा खूप छोटा आणि मंद आहे. दुसऱ्या पृथ्वीबाबतचे हे संशोधन ‘द अॅस्टोनॉमिकल जर्नल’च्या आगामी अंकात प्रकाशित होणार आहे. ‘टीओआय- 1231 बी’ या बाह्यग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा खूप मोठा आणि नेपच्यून ग्रहापेक्षा छोटा आहे. त्याचा तारा कमी प्रखर आणि थंड असल्यामुळे या बाह्यग्रहाचे तापमान वाढत नाही. या ग्रहावर हायड्रोजन किंवा हेलियम वातावरण असू शकते असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.