हिंदुस्थानने आपले सैन्य मागे घ्यावं, चीन समर्थक राष्ट्रपतींनी शपथ घेताच मालदीवने डोळे वटारले

हिंदुस्थानने मालदीवमधून आपले सैन्य मागे घ्यावे अशी विनंती मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने केली आहे. मोहम्मद मुईझ (Maldivian president Mohamed Muizzu) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये हे निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानंतर आता हिंदुस्थानचे मालदीवसोबतचे संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, मालदीव सरकारने हिंदुस्थानला आपले सैन्य मागे घेण्याची विनंती केली आहे. केंद्री मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी नुकतीच नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुईझ यांची राष्ट्रपती कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान ही औपचारिकपणे विनंती करण्यात आली आहे.

मालदीवमधून हिंदुस्थानी लष्कराला हुसकावून लावण्याची घोषणा मोहम्मद मुईझ यांनी राष्ट्रपती निवडणुकीवेळी केली होती. याला मालदीवच्या लोकांनीही समर्थन दिले आणि त्यांना विजयी केली. शनिवारी 18 नोव्हेंबर रोजी त्यांनी मालदीवच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. या शपथ ग्रहण सोहळ्यास केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे देखील हजर होते.

दरम्यान, मालदीवमध्ये हिंदुस्थानी लष्कराचा तळ असून आहे. या ठिकाणी तैनात असलेले जवान आजारी लोकांना एअरलिफ्ट करण्यापासून ते अंमली पदार्थविरोधी मोहीमही राबवतात. गेल्या पाच वर्षात हिंदुस्थानच्या जवानांनी मालदीवच्या 523 लोकांचा जीव वाचवा असून सागरी सुरळेसाठी 450 हून अधिक मोहिमाही फत्ते केल्या.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मोहम्मद मुईझ यांनी ‘इंडिया आऊट’चा नारा दिला होता. मुईझ यांचा पक्ष चीन समर्थक असून आता हाती सत्ता येताच त्यांनी हिंदुस्थानी लष्कर मागे घेण्याची विनंती केली आहे. मालदीवच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी देशात कोणत्याही परदेशी सैन्याला थारा देणार नाही, असेही ते राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर म्हणाले. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.