‘न्यू दिल्ली टाइम्स’चा सिक्वेल येतोय

488

प्रसारमाध्यमे आणि राजकारण यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा ‘न्यू दिल्ली टाइम्स’ या 1986 च्या चित्रपटाचा सिक्वेल आता लवकरच येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश शर्मा हेच हा सिक्वेल काढणार असून लेखक-दिग्दर्शक खालीद मोहम्मद याची पटकथा लिहिणार आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांची निवड लवकरच केली जाईल, असे खालीद मोहम्मद यांनी सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर, ओम पुरी, शर्मिला टागोर, कुलभूषण खरवंदा यांचा दमदार अभिनय असलेला ‘न्यू दिल्ली टाईम्स’ हा चित्रपट बराच गाजला होता. रमेश शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने त्यांना पदार्पणातच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळवून दिला. गीतकार गुलजार यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या