
अमेरिकेनंतर कॅनडामध्ये मराठी माणसे जास्त आहेत. नवीन देशात स्थलांतर म्हणजे आयुष्याची नवीन सुरुवात. अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर कॅनडातील मराठी लोकांच्या मदतीसाठी संस्था असावी या उद्देशाने दीप्ती म्हस्के यांनी ‘मराठी इन कॅनडा’ या संस्थेची 29 ऑगस्ट 2022 रोजी टोरँटो, कॅनडा येथे स्थापना केली. या कामात मूळचे मुंबई- कोल्हापूर येथील आणि सध्या कॅनडाचे नागरिक असलेले सुजित बेजवाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुरुवातीला 10 समविचारी लोकांनी सुरू केलेल्या संस्थेचे आज हजाराहून अधिक सभासद आहेत.
‘मराठी इन कॅनडा’च्या माध्यमातून कॅनडामध्ये विविध प्रांतात विखुरलेल्या मराठी माणसांना संघटित करून त्यांच्या कौशल्याचा उपयोग इतरांना करून दिला जात आहे. ही सेवा निःशुल्क आहे. संस्थेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता विजयादशमीच्या मुहूर्तावर www.mimedarathied.ceda संकेतस्थळ सुरू होत आहे. यामुळे जगभरातील मराठी समाजापर्यंत सहजपणे पोचणे शक्य होणार आहे.
























































