नववर्षाच्या जल्लोषात 6 जणांनी जीव गमावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पार्ट्या, विविध कार्यक्रम अशी रेलचेल पाहायला मिळते. पण याच दरम्यान काही जणांनी जोश-जल्लोषात काळजी न घेतल्याने त्यांना जीव गमवावा लागाला आहे. विविध घटनांमध्ये तब्बल 6 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.

ईशान्य दिल्लीत नववर्षाचे स्वागत करताना डिजेवर धिंगाणा सुरू असताना 8 वर्षाच्या रेहानला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर अशाच प्रकारच्या एका घटनेत 14 वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना वेलकम पोलीस ठाण्यांतर्गत घडली.

तर बिहारची राजधानी पाटण्यातील राजापुरा भागात पार्टी सुरू असताना एका तरुणाचा इमारतीच्या छतावरून पडून मृत्यू झाला. पण ही हत्या असण्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास सुरू आहे. याप्रकरणी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

राजस्थानमध्ये जैसलमेर येथून कार्यक्रमावरून परतणाऱ्या चार गाड्यांची एकमेकांशी धडक झाली. या धडकेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले आहेत.