न्यूझीलंडला अंतिम फेरीचे तिकीट;किवीजने 2019 च्या पराभवाचे उट्टे काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडने 2019च्या जिवाला लागलेल्या पराभवाचे उट्टे फेडत आज अबुधाबीत इंग्लंडला 5 विकेट आणि 6 चेंडू राखून पराभूत केले. टी-20 विश्वचषकातील आजची उपांत्य लढत जिंपून किवीजनी दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. आजच्या लढतीचा हिरो ठरला न्यूझीलंडचा डेरील मिचेल. त्याने आपल्या 72 धावांच्या नाबाद  खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी केली. त्याला सुरेख साथ यष्टीरक्षक डेवोन कॉनवेने देत 38 चेंडूंत 46 धावांची धडाकेबाज खेळी केली. मिचेलला या लढतीचा ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

नाणेफेक  जिंपून  न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर जॉस बटलर आणि रॉनी बेअरस्ट्रो यांनी पहिल्या गडय़ासाठी 37 धावांची भागीदारी केली. सलामीवीर तंबूत परतल्यानंतर डेव्हीड मलान आणि मोईन अली यांनी इंग्लंडचा डाव सावला. मोईनने 37 चेंडूंमध्ये तीन चौकार, दोन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर मलान याने 30 चेंडूंत 41 धावा करत इंग्लंडची  धावसंख्या 166पर्यंत पोहचवली. इंग्लंडने दिलेल्या 167 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गुप्तील अवघ्या चार धावांवर तंबूत परतला, तर न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त असणारा केन विल्यमसनदेखील जादू दाखवू शकला नाही. दोन बाद तेरा अशी अवस्था झालेली असताना डेरील मिचेल आणि डेवोन  कॉनवे यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. कॉनवे याने 38 चेंडूंमध्ये 46 धावा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या जिमी निशम याने 11 चेंडूंत 27 धावांची मोलाची खेळी करत न्यूझीलंडला विजयाच्या जवळ आणून ठेवले. मात्र डेरील मिचेल याने 47 चेंडूंमध्ये नाबाद 72 धावांची धडाकेबाज खेळी करून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने प्रथमच टी-20 विश्वचषकात अंतिम सामना गाठला आहे. आता 14 नोव्हेंबर रोजी विजेते पदासाठी न्यूझीलंडबरोबर कोण भिडणार याचा निर्णय उद्या लागेल.