केन विलियमसन तिसऱ्यांदा बाबा झाला, घरी आली छोटी पाहुणी

न्यूझिलंडचा स्टार खेळाडू केन विलियमसन तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी साराने मुलीला जन्म दिला आहे, विलियमसनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना बायको मुलीसोबत फोटो शेअर करत माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

केन विलियमसन याला दोन मुले आहेत. त्यांची मुलगी तीन वर्षांची आहे तर मुलगा एक वर्षाचा आहे. विलियमसनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तो बायको मुलीसोबत दिसत आहे. त्या फोटोसोबत दिलेल्या फोटोओळीत त्याने लिहीलेय की, या नव्या पाहुण्याचे स्वागत आहे. “Welcome to the world beautiful Girl. So grateful for your safe arrival and the exciting journey ahead अशी फोटोओळ दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kane Williamson (@kane_s_w)

 विल्यमसनच्या या फोटोवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. सहकारी खेळाडूंसोबतच चाहतेही त्याचे अभिनंदन करत आहेत. विल्यमसनच्या या फोटोला 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले होते. तिथे हजारो कमेंट्स बघितल्या गेल्या आहेत. विल्यमसनला आधीच दोन मुले आहेत. त्यांची मुलगी सुमारे 3 वर्षांची असून तिचे नाव मॅगी आहे. मुलाचे वय सुमारे एक वर्ष आहे. विल्यमसन सध्या रजेवर आहे. तो आपला सर्व वेळ पत्नी साराला देत आहे.