पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, एनआयएच्या कार्यालयात धमकीचा ईमेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याबाबतचा धमकीचा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आल्याचे समोर आले आहे. हा ईमेल करणाऱयाने त्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा करत मोदींना मारण्यासाठी आरडीएक्स हल्ल्याचा कट असल्याचे म्हटले आहे. यामुळे सर्वच सुरक्षा यंत्रणांना अॅलर्ट करण्यात आले. मात्र या धमकीत काही तथ्य दिसून येत नसल्याचे सुरक्षा यंत्रणेच्या सूत्रांकडून समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे आरडीएक्सचा मोठा साठा असून आरडीएक्सचा हल्ला करून मोदींना मारण्यात येईल, असे एनआयएला आलेल्या धमकीत म्हटले आहे. माझा दहशतवादी संघटनांशी संबंध असून हा कट उघडकीस येऊ नये याकरिता आपण आत्महत्या करणार असल्याचे ईमेल पाठविणाऱयाने म्हटले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येते. दरम्यान हा मेल एक महिन्यापूर्वी आल्याचे एनआयए म्हटले आहे.