सेक्स रॅकेट चालवणा-या स्पा सेंटरवर निगडी पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निगडी येथील थरमॅक्स चौकात हुंदाई शोरूमच्या मागील बाजूला ऑन टाइम ब्युटी अँड स्पा नावाच्या मसाज सेंटरवर निगडी पोलिसांनी छापा मारला. त्यात स्पा सेंटरच्या मालकाला अटक करत तीन महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. 12) दुपारी करण्यात आली.

तानाजी उर्फ राजेश व्यंकट कानुरे (वय 32, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या स्पा सेंटरच्या मालकाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तानाजी थरमॅक्स चौकात ऑन टाइम ब्युटी अँड स्पा नावाचे मसाज सेंटर चालवत होता. निगडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला एका बनावट ग्राहकाला सेंटरमध्ये पाठवून खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास स्पा सेंटरवर छापा मारला.

या कारवाईमध्ये पोलिसांनी स्पा मालक तानाजी याला अटक केली. अल्पवयीन मॅनेजरवर गुन्हा नोंदवला. तसेच तीन महिलांची सुटका केली. स्पा सेंटरमधून 31 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी तानाजी हा स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, उपनिरीक्षक महेंद्र आहेर, केरबा माकणे, सहाय्यक फौजदार मछिंद्र घनवट, पोलीस हवालदार सतीश ढोले, महिला पोलीस हवालदार परवीन पठाण, पोलीस शिपाई विनोद व्हनमाने, सोपं बोधवड, दीपक जाधवर यांच्या पथकाने केली.