निखिलचा चार्म आता वेबसीरिजमधून झळकणार

31

सामना प्रतिनिधी । मुंबई

छोट्या-छोट्या पण वेधक भूमिकांतून प्रेक्षक पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहेरा म्हणजे निखिल चव्हाण. अल्पावधीतच लोकप्रियता लाभलेल्या निखिलची एण्ट्री आता ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ या नव्याकोर्‍या वेबसीरिजमधून झाली आहे. आजच्या काळाशी सुसंगत ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ या सिझलिंग वेबसीरिजमध्ये सध्या निखिल ‘सचिन’ ऊर्फ ‘सच्या’च्या भूमिकेत दिसत आहे. तीन मैत्रिणींच्या आयुष्यातला तिढा सोडवण्यासाठी स्वयंसज्ज असणारा हा उतावळा ‘सच्या’ काय काय गमती घडवून आणतो आणि ‘सच्या’च्या येण्याने त्या मैत्रिणींचा तिढा सुटतो की आणखी गुंततो हे पाहणं रंजक ठरत आहे. विशिष्ट प्रकारची देहबोली, चालण्या-बोलण्यातल्या लकबी शिवाय नोदाचं अचूक बेरिंग सांभाळत निखिलने साकारलेला हा ‘सच्या’ही सगळ्यांना आपलासा वाटला आणि तो मनमुराद हसवतोयदेखील.

आपली प्रतिक्रिया द्या