
राजस्थानमध्ये एक भीषण दुर्घटना झाली आहे. लग्नाहून परतत असताना वऱ्हाडाची कार चंबळ नदीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नवरदेवाचाही समावेश आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
बरवाडावरून परतत असताना मध्यरात्री कारला अपघात झाला. अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत कार नदीतून बाहेर काढली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहे. या दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी दुर्दैवी घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
सदर वऱ्हाड उज्जैनला जात होते. वऱ्हाड्यांची बस पुढे निघून गेली होती आणि नवरदेवाला घेऊन जाणारी कार रस्ता भरकटली होती. याच दरम्यान चाकलाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नदीत कोसळली. यानंतर बचाव पथकाने कार नदीतून बाहेर काढली आहे. कारमधून सात आणि नदीतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती कोटाचे एसबी केसर सिंह शेखावत यांनी दिली आहे.
बारात उज्जैन जा रही थी, बस आगे निकल गई ये गाड़ी रास्ता भटक कर छोटे पुल पर आ गई और नियंत्रण से बाहर होकर नदी में गिर गई। 7 शव गाड़ी से और 2 शव रेस्क्यू ऑपरेशन में पानी से बरामद की गई हैं: केसर सिंह शेखावत, एसपी सिटी कोटा, राजस्थान pic.twitter.com/r9TjY7ZJMM
— ANI_HindiNews (@AHindinews) February 20, 2022
गाझियाबादमध्येही अपघात
दरम्यान, राजस्थानप्रमाणे गाझियाबादमध्येही काही दिवसांपूर्वी असाच एक अपघात झाला होता. इंदिरापूरम पोलीस स्थानक भागात रात्रीच्या एकच्या सुमारास वसुंधरा-इंदिरापूरम कनावली पुवावरून एक वेगवान कार नदीत कोसळली होती. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. ललित, देबू आणि सोनू अशी मृतांची नावे आहेत. लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले असताना हा अपघात झाला होता.




























































