नीरव मोदीच्या पत्नीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 13,500 कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीची पत्नी अमी मोदी हिला मोठा झटका बसला आहे. तिच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. ही नोटीस म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अटक वॉरंट असून यानंतर लवकरच अमीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदीप्रमाणेच अमी हिच्याविरोधातही हिंदुस्थानात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने नोटीस बजावली आहे. याआधी नीरव मोदी, त्याचा भाऊ नेहल आणि बहिण पूर्वी यांच्याविरोधातही रेड कॉर्नर नोटिस जारी केली आहे. हिंदुस्थानातून फरार झालेला नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांविरोधात पीएनबी घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे. मोदीला मार्च 2019 मध्ये लंडनमध्ये अटक करण्यात आली. सध्या तो तेथील वॅण्ड्सवर्थ तुरुंगात कैद आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या