रत्नागिरीतही होणार ‘निर्भय बनो’ची सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीत होणाऱ्या निर्भय बनो सभेच्या नियोजनाची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.

विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांच्या उपस्थितीत लवकरच निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेबाबत नियोजन आणि प्रचाराची चर्चा करण्यात आली. हिंदूस्थानचे संविधान आणि लोकशाही वाचवणे यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या बैठकीला अभिजीत हेगशेट्ये, बशीर मुर्तुझा, दीपक राऊत, नीलेश भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.