घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीची निर्भया पथकाने केली सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

बिहारहून मुंबईत घरकामासाठी आणलेल्या 9 वर्षांच्या मुलीची वाकोला पोलिसांच्या निर्भया पथकाने सुटका केली. घडल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी इरफान हैदरीला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी ही मूळची बिहारची रहिवासी आहे. दीड महिन्यापूर्वी ती मुंबईत आली असून ती हैदरी यांच्या घरी घरकाम करत होती. मुलगी घरकाम करत असल्याचा व्हिडीओ वाकोला पोलिसांना मिळाला. त्या व्हिडीओची दखल घेत वाकोला पोलिसांच्या निर्भया पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या मुलीच्या आईला संपर्क साधला. मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन असून ते तिला मारहाण करतात. त्यामुळे त्या मुलीला हैदर यांच्या घरी पाठवल्याचे मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या मुलीची सुटका करून तिची रवानगी अंधेरी येथील बालगृहात केली आहे.