
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रात नवी सरकार येऊन चोवीस तास होण्याच्या आतच आर्थिक पातळीवर मोठा झटका हिंदुस्थानला बसला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आर्थिक विकासदर 6 टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढे देशाची आर्थिक घडी नीट बसविण्याचे प्रमुख आव्हान आहे.
– गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये आपला आर्थिक विकास दर 6.4 च्या खाली आला. हा आर्थिक विकास दर वाढविण्याचे सर्वात मोठे आव्हान देशापुढे आहे.
– जीएसटी प्रक्रिया अधिक सोपी, सुटसुटीत करणे, सार्कजनिक तसेच खासगी क्षेत्रामधील गुंतकणुकीला प्रोत्साहन देणे n रोजगार निर्मिती यावर नव्या अर्थमंत्र्यांना पहिला अर्थसंकल्प तयार करताना सर्वाधिक लक्ष द्यावे लागेल.
महागाईवर नियंत्रण
– मोदी सरकारने निश्चित पावले टाकीत महागाईचा दर प्रत्येक वर्षागणिक खाली आणला.
– तो आता 3.85 टक्के एकढा आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ लक्षात घेता जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर नियंत्रण ठेवण्याची कसोटी असेल.




























































