
रोजच्या इंधन दरवाढीमुळे जनतेचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. आता या इंधन दरवाढीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली; पण ती अमेरिकेतून.
अर्थव्यवस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. यात प्रामुख्याने इंधन दरवाढीचे मोठे आव्हान आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत असून केंद्र सरकारच्या खर्चावर मर्यादा पडण्यावरही होत आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. ही दरवाढ माझ्यासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे. अर्थमंत्रालयातील आमची टीम याकडे अभ्यासपूर्वक पद्धतीने पाहत आहे, असे त्या म्हणाल्या.




























































