ज्येष्ठांनी आता निवृत्त व्हावे गडकरींचा सल्ला

जुन्या पिढीतील लोकांनी हळूहळू निवृत्त व्हावे आणि नव्या पिढीकडे जबाबदारी सोपवून मार्गदर्शन करावे, असा सल्ला  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीची चर्चा होत असताना गडकरी यांनी दिलेला हा सल्ला म्हणजे भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठांना टोला असल्याचे म्हटले जात आहे. ज्येष्ठांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करावे आणि नवीन लोक व्यवस्थित काम करू लागतील तेव्हा ज्येष्ठांनी दुसरे काम करावे, असेही गडकरी म्हणाले.