काँग्रेसने मोदींना दिलेल्या शिव्या आमच्यासाठी 56 भोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड शिव्या दिल्या. पण,या शिव्या आमच्यासाठी 56 भोग आहेत असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला.  पंतप्रधान कुण्या एका पक्षाचा नसतो, संपुर्ण देशाचा असतो. परंतु, काँग्रेस इतक्या खालच्या पातळीवर घसरली की त्यांनी शिव्याच द्यायला सुरुवात केली, अशी टीकाही नितीन गडकरी यांनी केली.

जे 1984 मध्ये उसळलेल्या दंगलीतील पिडीतांना जे न्याय देऊ शकले नाहीत ते गरीबांना काय न्याय देणार असा सवालही गडकरी यांनी यावेळी केला. गुरुवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधानांचा सन्मान करण्यापेक्षा काँग्रेसने त्यांना अत्यंत खालच्या पातळीवरून येऊन टीका केल्याचा आरोप गडकरी यांनी यावेळी केला. 1971 च्या युध्दात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पाठींबा दिला होता. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे त्यांनी म्हटले होते. परंतु, आता सुरक्षेच्या मुद्दय़ावरूनही काँग्रेस राजकारण करत असल्याचे गडकरी म्हणाले.