
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘लालकृष्ण आडवाणी हे आता 90 वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्यांना संधी देण्यात आली आहे., स्पष्टीकरण केंद्रीय रस्ते वाहतूक व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. लालकृष्ण आडवाणी यांना उमेदवारी न देण्याबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी हे सांगितले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपने तिकीट दिलेले नाही. त्यांच्या मतदारसंघातून यंदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहेत. याबाबत आज तक ला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांना प्रश्न करण्यात आला. ‘ आडवाणी हे आमचे मार्गदर्शक आहेत व राहतील. आमचा पक्ष कायम वरिष्ठ नेत्यांचा सन्मान करत आला आहे. पण आता आडवाणींचे वय 90 झाले आहे. त्यामुळे त्यांच्याजागी पक्षातील इतर लोकांना संधी देण्यात आली. अटल आडवाणी हे युग संपले नाही मात्र पक्ष पुढे जात असतो’, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.



























































