नितीन गडकरी यांना चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, शरद पवारांच्या हस्ते 29 जुलै रोजी वितरण

nitin-gadkari

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सरहद संस्थेने सुरू केलेला चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. 29 जुलै रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते गडकरींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख एक रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्लीत ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो, हा दुसरा चिंतामणराव देशमुख पुरस्कार नितीन गडकरी यांना देण्याचा निर्णय झाल्याचे सरहद संस्थेचे विश्वस्त संजय नहार व लेशपाल जवळगे यांनी एका पत्रकार परिषदेत नमूद केले.