बिहारमध्ये कुटुंबकल्याण, मंत्रिमंडळात नेत्याची मुलंबाळं

नितीश कुमार यांनी आज दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य 26 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात नेत्यांच्या मुलाबाळांचा भरणा असल्यामुळे बिहारमध्ये ‘कुटुंबकल्याण’पर्व सुरू झाल्याची चर्चा आहे. नव्या मंत्रिमंडळात सम्राट चौधरी, विजय कुमार चौधरी, अशोक चौधरी, संतोष कुमार सुमन, सुनील कुमार, नितीन नबीन, श्रेयसी सिंह, रमा निषाद, लेशी सिंह व राष्ट्रीय लोक मोर्चाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांचे चिरंजीव दीपक प्रकाश यांचा समावेश आहे.