
एनएमएमटीच्या कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग महापालिका प्रशासनाने लागू केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱयांच्या पगारामध्येही पालिका कर्मचाऱयांच्या पगाराप्रमाणेच घसघशीत वाढ होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे तुर्भे, घणसोली आणि आसूडगाव आगारांमध्ये कर्मचाऱयांनी मोठा जल्लोष केला. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
एनएमएमटीच्या कर्मचाऱयांनाही सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार बैठका घेऊन सातव्या वेतन आयोगासाठी जोरदार पाठपुरावा केला. खासदार राजन विचारे यांनीही हा प्रश्न लावून धरला होता.
प्रश्न मार्गी लागला
एनएमएमटीच्या कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद विजय नाहटा यांच्याकडे आल्यानंतर अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागले आहेत. या कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस प्रकाश चिकणे, सहसरचिटणीस समीर बागवान यांनीही विशेष परिश्रम घेतले.





























































