
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजली जाणार्या धारावी झोपडपट्टीत गेल्या 24 तासात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. धारावीत 1 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत होता. आज तब्बल आठ महिन्यांनंतर एकही रुग्ण आढळला नसल्याने शासनाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आज पहिल्यांदाच एकही #कोरोना संक्रमित रुग्ण आढळलेला नाही
एक एप्रिलपासून आज पहिल्यांदाच धारावीत एकाही कोवीड रुग्णाची
नोंद नाही
@DDNewslive @DDNewsHindi #COVID19 #Dharavi pic.twitter.com/rgbzPXKVdi— सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 25, 2020
2.5 वर्गकिलोमीटरवर पसलेल्या धारावीची लोकसंख्या साडे सहा लाखहून अधिक आहे. 1 एप्रिल रोजी या भागात पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. आतापर्यंत या भागात 3 हजार 700रुग्ण आढळले आहेत. सध्या या भागात सक्रिय रुग्णांची संख्या 10 हून कमी आहे.
राज्यात आतापर्यंत 19 लाखहून अधिक रुग्ण आढळले होते. राज्यात मृत्यू दर 2.57 असून आतापर्यंत 44 हजार 969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.





























































