कॉलेज सुरू करताना बाहेरचे तज्ज्ञ, अभ्यास दौरे नकोत!‘यूजीसी’ची महाविद्यालयांना तंबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल दहा महिन्यांनंतर 15 फेब्रुवारीपासून देशातील बहुतांश राज्यांमधील महाविद्यालये सुरू होत आहेत. पण ती सुरू करताना कडक नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. महाविद्यालयात बाहेरच्या तज्ञांना बोलवण्यास तसेच विद्यार्थ्यांसाठी बाहेरचे अभ्यास दौरे आयोजित करण्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मनाई केली आहे. इतकेच नव्हे तर महाविद्यालयात पुणालाही ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नये अशी तंबी दिली आहे.

कोरोना महामारीमुळे देशातील महाविद्यालये मार्च 2020 पासून बंद आहेत. आता नियमावलीचे पालन करून महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. यूजीसीने महाविद्यालयांना काही विशेष नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नको असे यूजीसीने सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्यास सक्ती करू नये. त्यांच्यासाठी शिकवणीची वेगळी सोय करण्याबाबत योजना बनवावी अशा सूचना यूजीसीने दिल्या आहेत.

यूजीसीने दिलेल्या विशेष सूचना

  • महाविद्यालयात तणावमुक्त वातावरण रहावे यासाठी समुपदेशकांची नियमित उपस्थिती अनिवार्य.
  • शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नये.
  • महाविद्यालयात येणाऱया प्रत्येकाला ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करायला सांगावा.
  • महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी आसपासच्या परिसरातील कोविड परिस्थितीचा आढावा घ्यावा.
  • कन्टेनमेंट झोनमधील विद्यार्थी आणि कर्मचारी महाविद्यालयात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच महाविद्यालयात येणाऱया विद्यार्थ्यांनी कन्टेनमेंट झोनमध्ये जाणे टाळावे.
  • 50 टक्के उपस्थितीत संशोधन प्रकल्पातील तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घ्यावेत.

‘पॉझिटिव्ह’ आढळणाऱयांवर उपचाराची पूर्वतयारी 
टेम्परेचर तपासणीत एखाद्या विद्यार्थी किंवा कर्मचार्याला ताप असल्याचे आढळले तर त्याला तातडीने इतरांपासून विलग ठेवावे. चाचणी केल्यानंतर त्यात पुणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवावे. त्यादृष्टीने जवळच्या रुग्णालयाशी संपर्प ठेवावा. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपका&त आलेल्या प्रत्येकाची चाचणी करावी असेही यूजीसीने महाविद्यालयांना कळवले आहे.

शिकवणी वर्गांची वेळ वाढवण्यास मुभा
संस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे शिकवणी वर्गांची वेळ वाढवण्यास यूजीसीने मुभा दिली आहे. आठवडय़ातून सहा दिवस वर्ग घ्यावेत. वर्गांमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची काळजी घेऊन बैठक व्यवस्थेचे नियोजन करावे. त्यासाठी वर्गांचा आकार पार्टिशन टापून कमी करता येऊ शकेल असे यूजीसीने म्हटले आहे.