गोरगरिबांना रोजगार देणाऱ्या निंबोळीचा दुष्काळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवणी

सलग तिन वर्षाचा दुष्काळ आणि यावर्षी दोन महीन्याचा कालावधी होऊनही पावसाने मारलेली दांडी, जेवढे होते तेवढे मातीत घातलं, आता घरसंसार कसा चालवायचा? असा प्रश्न शेतकऱ्यासोबत शेतमजुरांपुढे असतोच अशा परिस्थितीत बाजारहाट करण्यासाठी दरवर्षी निंबोळीचा आधार असायचा. मात्र या वर्षी त्यावरही दुष्काळ पडला असून वडवणीच्या आठवडी बाजारात १५०० क्विंटल च्या जवळपास येणारी निंबोळी चक्क एक क्विंटल ही येऊ शकली नाही निबोळी चे उत्पादन नसल्याने सर्व सामान्य कुटुंबाचा संसार चालणारा आधारच गेला आहे.

अल्पशा पावसावर केलेली पेरणी. त्यानंतर फिरवलेली पाठ, यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट आणि भयानक निर्माण झाली आहे. आठवडी बाजाराचा गुजारा कसा करायचा, अशा विवंचनेत शेतकरी आणि शेतमजुर आहे. सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. तरीही कर्जाचे ओझे डोक्यावर घेत नव्या जोमाने उधारपादार करत, घरात होते नव्हते ते सर्व बाजारात विकून पेरणी केली. मात्र तरीही पावसाने पाठ फिरवली. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आठवडी बाजारात पाच रुपये किलोने निंबोळी विकून घर चालवण्यासाठी संपूर्ण परीवारातील माणसे भटकंती करत आहेत मात्र यावर्षी लिंबाच्या झाडाला निंबोळी कमी असल्याने त्यावरही दुष्काळ आला आहे. कमी पावसामुळे निंबोळीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. दरवर्षी वडवणीच्या आठवडी बाजारात जवळपास १,५०० क्विंटलची आवक यायची यावर्षी मात्र चक्क १०० क्विंटल आवक येत असल्याने सर्व सामान्य मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.