कोल्हापूरला दिलासा; सोमवारी एकाही नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकही कोरोनाबाधित नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 720 वर स्थिरावली आहे. आतापर्यंत 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 631रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या 81 कोरोनाबाधित रुग्णांवर सीपीआरमध्ये कोरोना कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.

सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत आलेल्या 92 अहवालांपैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 179 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर भुदरगड- 71, चंदगड-75, गडहिंग्लज-81, गगनबावडा-6, हातकणंगले-10,कागल-57, करवीर-21, पन्हाळा-27, राधानगरी-66, शिरोळ-7 ,नगरपरिषद क्षेत्र-11 आणि कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.