आदर्श सोसायटी घोटाळ्याची नव्याने चौकशी नाही, सक्तवसुली संचालनालयानाकडून स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा येथील आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात येणार या वृताचे सक्तवसुली संचालनालयाकडून खंडन करण्यात आले आहे. या प्रकरणात अशी कोणतीही नव्याने चौकशी करण्यात येणार नाही असे ईडी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची ईडी कडून नव्याने चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण असे काहीही करण्यात येणार नाही. या वृत्तामध्ये काहीच तथ्य नसून या घोटाळ्याची कोणतीही नव्याने चौकशी करण्यात येणार नाही असे ईडीकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.