आंतरवाली सराटी गावात शुकशुकाट

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना परभणी जिह्यातील आंतरवाली सराटी या गावात मात्र शुकशुकाट आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनाने हे गाव जगाच्या नकाशावर आले. शुक्रवार, 26 एप्रिलला या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे, मात्र इथे एकाही पक्षाचा उमेदवार मते मागण्यासाठी फिरकलेला नाही.