पाणी पुरवठा करायला टँकरच नाही; खासगी टँकरवाल्यांचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यामध्येही पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. गावडेआंबेरे, केळये, साखरतर या ठिकाणी 10 दिवस पाणी आलेले नाही. दरवर्षी 25 मे रोजी असणारी परिस्थिती यंदाच्या वर्षी 9 मे रोजीच दिसून येत आहे. रत्नागिरी तालुक्याकडे टँकंर नसल्यामुळे आता खासगी टँकरवाल्यासमोर प्रशासनाला हातापाया पडावे लागत आहे. खासगी टँकंरवालेही शासकीय दर परवडत नाहीत अशी कारणे देत असल्यामुळे पाणी पुरवठा कसा करावा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

गतवर्षीपेक्षाही यंदा भूजल पातळी कमालीची खालावली आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे अनेकं कामे प्रलंबित राहिली होती. आचारसंहिता शिथील झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून 25 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. या साठी 1 कोटी 60 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामे पावसाळ्यापुर्वी पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यु़. सी. उपाध्ये यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली. यांनी पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी खासगी टँकंरने पाणी पुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. परंतू यासाठी देण्यात येणारा शासकीय दर खासगी टँकरचालकांना परवडत नाही. त्यामुळे खासगी टँकरने पाणी पुरवठा करता येत नाही. तसेच शासनाच्या नियमानुसार खासगी पाणी पुरवठा कंरणार्‍ या टँकरवर जीपीएस सिस्टिम बसवायला खासगी चालक नकार देत आहेत़ याबाबत रत्नागिरी पंचायत समितीच्या मासिक सभेत जोरदार चर्चा झाली.