तीन हजारांच्या उधारीसाठी गुंडांनी फळविक्रेत्याची विवस्त्र करुन काढली धिंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नोएडा भाजीमंडईत एका फळ विक्रेत्याला तीन हजार रुपयांची उधारी महागात पडली आहे. उधारी वेळत न दिल्याने काही गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्या विक्रेत्याची विवस्त्र करुन गावात धिंड काढली. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडीयावर एका भाजी मंडईतला व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मंडईत दुकान लावलेले दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मारहाण करणाऱ्या गुंडांचे 3000 हजार रुपये पिडीत व्यक्तीवर उधारी होती. पिडीत व्यक्तीने त्याचे पैसे वेळवर न दिल्याने त्याला मारहाण करुन विवस्त्र केले.   या व्यक्तीने लसूण घेतले होते, त्याची तीन हजार रुपयांची उधारी होती. उधारी वेळेत न दिल्याने काही गुंडांनी त्याला बेदम मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला विवस्त्र करुन त्याला संपूर्ण मंडईत फिरवले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी कारवाई सुरु केली आहे. पिडीत व्यक्तीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांच्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे. व्हिडीओतील पिडीत व्यक्तीच्या तक्रारीवरुन सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींची चौकशी करुन लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.