नोकियातील 14 हजार नोकऱ्यांवर गंडांतर; फोनची विक्री घटल्याने निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकिया फोनची बाजारातील विक्री मोठय़ा प्रमाणात घसरली आहे. यामुळे कंपनीने 14 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकियाची 2023 च्या तिसऱ्या तिमाहीतील एकूण विक्री 20 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. त्यामुळे कंपनी 14 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. नोकिया पंपनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून 2026 पर्यंत 800 मिलियन यूरो ते 1.2 बिलियन यूरोपर्यंत कपात करणार आहे. पंपनी 2026 पर्यंत आपली ऑपरेटिंग मार्जिन कमीत कमी 14 टक्के ठेवणार आहे. नोकिया कंपनीत सध्या 86 हजार कर्मचारी काम करतात. कंपनी ही संख्या 72 हजारांपर्यंत कमी करणार आहे. 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत नेट सेल्समध्ये मोठी घसरण झाली असून यादरम्यान 6.24 बिलियन यूरोवरून 4.98 बिलियन यूरोपर्यंत घसरण झाली आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा सर्वात कठीण व्यावसायिक निर्णय आम्हाला घ्यावा लागत आहे. मोबाईल नेटवर्कमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 टक्के घसरण झाली आहे.