औराद परिसरात अवकाळी पाऊस: वीज पडून दोन बैल दगावले

38

सामना प्रतिनिधी । औराद शहाजानी

निलंगा तालुक्यात २२ मेच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर माने जवळगा गावात वीज पडून दोन बैल मरण पावले.

या अवकाळी पावसामुळे आंबा व द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर येथून जवळच असलेल्या माने जवळगा गावातील शेतकरी राम तांबरवाडे यांची बैलजोडी रात्रीच्या अवकाळी पावसात पडलेल्या विजेमुळे दगावली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही मोठे संकट ओढवले आहे. गेल्या पाच – दहा वर्षात उष्णतेचे तापमान एवढे कधीही वाढले नव्हते. त्या उष्णतेचा परिणाम म्हणून अवेळी पडणाऱ्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तापमानात असलेली उष्णता थोडीफार कमी होणार आहे. त्यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळणार आहे व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या सुटणार आहे. या पावसामुळे फायदा, तोटा होणार आहे. असेच अवेळी पडणाऱ्या पावसानंतर वेळेवर जून या महिन्यातील मौसमी पाऊस दमदारपणे हजेरी लावली तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या