‘या’ देशात फक्त 40 मिनिटांचीच असते रात्र…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पृथ्वीतलावर अशा अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी भरलेल्या आहेत. ज्यावर आपण विश्वास ठेऊ शकत नाही, मात्र त्या खऱ्या असतात. या जगामध्ये असाही एक देश आहे, जिथे रात्र ही फक्त 40 मिनिटांची असते. ज्याला मध्यरात्री चमकणारा देश असं म्हटलं जातं आणि तो देश म्हणजे नॉर्वे. ऐकायला थोडं विचित्र वाटतं पण हो हे खरं आहे.

नॉर्वे हा एक उत्तर युरोपीय देश आहे. इथं फक्त 40 मिनिटांचीच रात्र असते. नॉर्वेमधील हेमरफेस्ट शहरात फक्त 40 मिनिटांचीच रात्र असते. येथे रात्री 12 वाजून 43 मिनिटांनी सुर्य मावळतो आणि फक्त 40 मिनिटांनंतर उगवतो. येथे इथे असं वर्षाच्या मे आणि जुलै महिन्यात घडतं. यामुळे नॉर्वेला ‘इंट्री ऑफ मिडनाइट सन’ म्हटले जाते.

1-1521209229

यामागचं नेमकं कारण काय ?

21 जून आणि 22 डिसेंबर या अशा तारखा आहेत, ज्या दिवशी सूर्यांचा प्रकाश धरतीच्या समान भागांमध्ये पसरत नाही. कारण पृथ्वी 66 अंश बनवून फिरते. यामुळे दिवस आणि रात्रीच्या वेळेमध्ये फरक येतो. नॉर्वे मध्ये 40 मिनिटांची रात्री 21 जूनच्या स्थितीमुळे होते. यावेळी 66 अंश उत्तरी अक्षांश ते 90 अंश उत्तरी अक्षांशपर्यंत पृथ्वीचा पूर्ण भाग सूर्य प्रकाशामध्ये राहतो. यामुळे सूर्य फक्त 40 मिनिटांसाठी मावळतो. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना शैलेश हालभावी यांनी ही माहिती दिली.