अंतिम लढतीतील निकालाने समाधानी नाही, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची भावना

90

सामना ऑनलाईन । लंडन

आम्ही क्रिकेट विश्वचषकाचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले खरे ,पण या विश्वविजेतेपदाचा खरा आनंद मात्र मनाला झाला नाही. कारण लॉर्डसच्या अंतिम लढतीत टाय सामन्यानंतर जो निकाल दिला गेला त्याने जेतेपदाचे पूर्ण समाधान मात्र आम्हाला मिळाले नाही. कारण त्यावरून झालेल्या विवादाने आमच्या विजयातले थ्रीलच निघून गेलेय, अशी भावना इंग्लंडचा विश्वविजयी कर्णधार इयान मॉर्गन याने व्यक्त केली आहे.

यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातली विश्वचषक अंतिम लढत अतिशय रोमहर्षक झाली.मूळ लढत टाय झाल्यावर सुपर ओव्हर खेळवण्यात आली.पण सुपर ओव्हरमध्येही लढत टाय झाल्याने अधिक बाउंड्रीच्या संख्येवर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे जगभरातील क्रिकेटशौकिनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यातच पंचांनी ओव्हरथ्रोवर सहा धावा इंग्लंडला बहाल केल्याने वादात आणखीनच भर पडली.त्यामुळेच इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने आपल्याला विजयाचा पूर्ण आनंद लाभला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या