
अवघ्या काही महिन्यात लंडनची कंपनी नथींग आपला तिसरा फोन लॉन्च करणार आहे, हा त्यांचा आधिचा फोन नथिंग फोन (2) चे स्वस्त व्हर्जन असणार आहे आणि त्याचे नाव नथिंग फोन (2a) ठेवले आहे. सध्या या फोन लॉन्चची तयारी सुरु आहे आणि याला अनेक सर्टिफिकेशन वेबसाईटवर पाठवण्यात आले आहे. आता हा फोन टीयूव्ही लिस्टींगमध्येही आला आहे.
नथिंग कंपनीचा हा नवा फोन, नथिंग फोन (2a) लवकरच येणार आहे. हा फोन त्याच्या मागच्या फोनपेक्षा स्वस्त असणार असून तो चार्जिंग जबरदस्त देणार आहे. या फोनने टीयूव्ही प्रमाणपत्र पास केले असून लिस्टींगमुळे कळले की हा फोन 45W एवढ्या वेगाने चार्ज होणार आहे.ही खूप चांगली गोष्ट आहे. साधारण फोनमध्ये एवढी वेगाने चार्जिंग नाही मिळतं.
विशेष म्हणजे नथिंग फोनचा हा 45W चार्जर युनिवर्सल यूएसबी पावर डिलिव्हरी स्टॅंडर्डवर काम करतात. हा तोच स्टॅडर्ट आहे जो आयफोन, गुगल पिक्सेल, सॅमसंग गॅलेक्सी फोनमध्येही वापरला जातो. दुसऱ्याबाजूने जास्तकरुन चायनाचे फोन हे स्वत:च्या फास्ट चार्जिंग स्टॅण्डर्डचा वापर करतात, जे दुसऱ्या ब्रॅण्डच्या फोनसोबत काम नाही करत. मात्र एवढ्या वेगाने चार्जिंग होणाऱ्या फोनमध्ये कदाचित बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही. असे यासाठी की युनिव्हर्सल यूएसबी-पीडी चार्जर अधिक महाग आहेत परंतु लॅपटॉप, आयपॅड आणि फोन लवकर चार्ज करू शकतात.
नथिंग फोन (2a) फिचर्स
स्क्रिन : 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले, जो 120Hz वेगाने फोटो बदलतो.
प्रोसेसर- मीडीयाटेक डायमेन्सिटी 7200 जी फोनला एकाच वेळी अनेक ॲप्स चालवण्याची परवानगी देते आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज, ज्यामध्ये तुमचा डेटा आणि फोटो आणि व्हिडिओ असतात.
कॅमेरा: 50MP मुख्य मागील कॅमेरा, दुसरा 50MP वाइड-अॅंगल कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा जो सेल्फी घेतो.
ऑपरेटिंग सिस्टम: नथिंग OS 2.5, जो Android 14 वर आधारित आहे आणि फोनवर चालतो.
बॅटरी: 4,290mAh बॅटरी जी 45W फास्ट चार्जिंगसह दिवसभर चालते जी पटकन चार्ज होते.



























































