जोकोविचचे अभियान सुरू, अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅमच्या दुसऱया फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच याने एका वर्षी चार ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या दिशेने बुधवारी पाऊल टाकले. या दिग्गज टेनिसपटूने पुरुष एकेरीतील सलामीच्या लढतीत 18 वर्षीय होल्गर रून याच्यावर 6-1, 6-7, 6-2, 6-1 अशा चार सेटमध्ये विजय मिळवला आणि दुसऱया फेरीत प्रवेश केला. नोवाक जोकोविच याने दोन तास व 15 मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवले.
महिला एकेरीत बियांकाची आगेपूच

21 वर्षीय बियांका आंद्रेस्क्यू हिने महिला एकेरीत आगेपूच केली. कॅनडाच्या बियांका आंद्रेस्क्यू हिने पहिल्या फेरीत व्हिक्टोरिया गोलुबीच हिच्यावर 7-5, 4-6, 7-5 अशा फरकाने विजय मिळवला आणि घोडदौड केली. बियांका आंद्रेस्क्यू हिने 2019 साली अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर ती या वर्षी या स्पर्धेत सहभागी झाली आहे.