कादंबरीकार अब्दुलरझाक यांना साहित्यातील नोबेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक यंदा तंजानियाचे कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना जाहीर झाले आहे. वसाहतवादाचा आखाती देशांतील निर्वासित व त्यांच्या संस्कृतीवर झालेला परिणाम याबद्दल लिहिताना गुर्ना यांनी कसलीही तडजोड केली नाही. वसाहतवादाविरुद्ध रोखठोक लिखाण केले, असे नोबेल समितीने म्हटले आहे.

गुर्ना यांच्या दहा कादंबऱया तसेच अनेक लघुकथा प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या लिखाणात निर्वासितांच्या समस्येचा/ विषय केंद्रस्थानी राहिला आहे. लहानपणापासूनच लिखाणावर जडलेले प्रेम त्यांनी उतारवयातही कायम जपले आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी इंग्रजीत लिहायला सुरुवात केली. पुढे इंग्रजी हीच त्यांच्या लिखाणाची भाषा बनली. आतापर्यंत 117 लोकांना साहित्यातील नोबेल मिळाले आहे. स्वीडनचे शास्त्रज्ञ अफ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 10 डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान केला जातो. सुवर्णपदक, एक कोटी स्वीडिश क्रोनर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.