अजित डोवाल पोहोचले अनंतनागमध्ये, नागरिकांशी केली चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू कश्मीरच्या अनंतनागमध्ये पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.

डोवाल अनंतनागमधील बकरी विकणार्‍या बाजारात पोहोचले. बकरी इदच्या पार्श्वभुमीवर लोकांनी इथे गर्दी केली होती.  डोवाल यांनी स्थानिक नागरिकांना इदच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचे हालहवाल विचारले. काहींनी अडचणी समोर येत असल्याच्या तक्रारी केल्या त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन डोवाल यांनी दिले. अनंतनागमध्ये एटीएम सुरू झाले आहेत तसेच बाजारही उघडण्यात आले आहेत.

जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर डोवाल खोर्‍यात दुसर्‍यांदा दौरा करत आहेत. अनंतनागमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. डोवाल बुधवारी शोपियाँ जिल्ह्यात पोहोचले होते. तिथे त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता.

तर दुसरीकडे जम्मू मधून जमावबंदी हटवण्यात आली आहे. राज्यात परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. जमावबंदी काढल्यानंतर सर्व जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालय सुरू झाले आहेत.