छोट्या बहिणीचा न्यूड व्हिडीओ बॉयफ्रेंडला पाठवला, तरुणीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत चाललं आहे, तसतसं तो सोयींपेक्षा जास्त डोकेदुखी बनलं आहे. आपल्या सख्ख्या बहिणीचा न्यूड व्हिडीओ काढून बॉयफ्रेंडला पाठवणाऱ्या एका तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी तरुणी आपल्या कुटुंबासह भायखळा इथे राहते. तिचे गेल्या चार वर्षांपासून दिनेश नावाच्या त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत. दिनेश विवाहित असून त्याला तीन मुलंही आहेत. बुधवारी सकाळी दिनेशची पत्नी पतीच्या फोनमध्ये आरोपी तरुणीच्या बहिणीचे न्यूड फोटो बघितल्याची तक्रार घेऊन तिच्या घरी गेली. ते फोटो दिनेशच्या मोबाईलवर आलेल्या एका न्यूड व्हिडीओतून क्लिक केले असावेत असं दिसत होतं.

हा व्हिडीओ तुमच्याच मुलीने त्याला पाठवल्याचा आरोप दिनेशच्या बायकोने तरुणीच्या कुटुंबासमोर केला. आधी या सगळ्याला नकार देणाऱ्या आरोपी तरुणीने आपणच तो व्हिडीओ दिनेशला पाठवल्याचं कबूल केलं. आरोपी तरुणीने दिनेशच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. दिनेशने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्याच्या बदल्यात तिच्याकडे तिच्या लहान बहिणीचे न्यूड फोटो मागितले होते. आरोपी तरुणीने त्याची अट मान्य करत बहीण आंघोळ करत असताना दिनेशला व्हिडीओ कॉल केला. त्यामुळे तिचा व्हिडीओ दिनेशच्या मोबाईलवर सेव्ह झाला. या प्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर दिनेश फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.