
रूग्ण मरणाच्या दारात असताना त्यांना अनेक गोष्टींचा पश्चाताप होत असतो. होम केअरमध्ये काम करणाऱ्या एका नर्सने याबाबत अनेक खुलासे केले आहेत. रुग्णांबाबत तिने अनेक अनुभव सांगितले आहेत. हेडली व्लाहोस(30) असे त्या परिचारिकेचे नाव आहे. जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
एका रूग्णाने त्यांना सांगितले होते की, जेव्हा तुम्ही मरता, त्यावेळी सोबत काही घेऊन जात नाही. तर अन्य एकाने सांगितले, योग्य वेळेची वाट बघत बसणं सोडून द्या आणि आतापासूनच ती वेळ सुरू करा. एका अन्य रूग्णाने सांगितले की, काश ते जवळच्या लोकांना सांगू शकले असते की, ते त्यांच्यावर किती प्रेम करतात. अन्य एकाने सांगितले की, कामासाठी कमी वेळ घालवा आणि कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवायला हवा होता. अमेरीकेच्या लूसियाना येथे राहणाऱ्या हेडले यांना रूग्णांनी हेही सांगितले की, स्वत:साठी गोष्टी करा, दुसऱ्यांसाठी नाही.
हेडले यांनी सांगितले की, रूग्णांनी सांगितले की, काश ते लोकांना सांगू शकले असते की ते त्यांच्यावर किती प्रेम करतात ते. या गोष्टीला हेडले तिच्या आयुष्यात लागू करते. ज्यांच्यासोबत अनेक वर्ष बोलणे झाले नाही, त्यांना सांगते की ते तिच्यासाठी किती महत्वाचे आहेत ते. काही लोकं हेडलेच्या मेसेजचा रिप्लाय देत नाहीत पण तरीही ती त्याचे वाईट मानून घेत नाही. मात्र तिला माहित आहे, जर काही झाले तर ते तिच्यासाठी किती महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काही शिकवते. कारण त्यांनी त्यांचे आयुष्य जगलेले असते. ते बऱ्याच गोष्टी शिकवू शकतात. पुढे ती म्हणाली की, तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही केवढ्या मोठ्या घरात राहतात याचा काही फरक पडत नाही. तुम्ही कशा पद्धतीने तुमचे आय़ुष्य जगता हे महत्वाचे आहे. एका अन्य रूग्णाने सांगितले की, त्याला डॉक्टर बनायचे होते त्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत होता आणि ती वेळ आलीच नाही.
अन्य एका रूग्णाने सांगितले की, त्याने संपूर्ण आयुष्य काम करण्यात घालवले आणि कुटुंबाला कधी वेळच दिला नाही. आता हेडल यांच्या म्हणण्यानुसार, ती याच सगळ्या गोष्टींमधून रोज वेगवेगळे शिकत असते आणि आपल्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करते. त्यांनी पाच गोष्टी सांगितल्या, ज्याबाबत रूग्णांना जास्त पश्चाताप होतो.
– जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कोणत्या गोष्टी सोबत घेऊन जात नाहीत
– योग्य वेळेची वाट पाहणे बंद करा, आतापासून जे काही सुरू करायचे ते करा.
– स्वत:साठी वेळी द्या, दुसऱ्यांसाठी नाही.
– कामाबरोबरच कुटुंबियांना जास्त वेळ द्या
– माझी इच्छा आहे की मी लोकांना सांगितले असते की ते माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत.



























































